Gundi, Mukta
(2023)
गोष्ट हाये पृथ्वीमोलाची!
Maharashtra Times.
Abstract
गंगा ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांचा संगम होतो, तिथलं सुंदरबन नावाचं खारफुटीचं जंगल. रात्रीच्या अंधारात तिथल्या बोनोबीबी देवीचं स्मरण करत एक तरुणी नदीपात्रात मासे पकडायचं जाळं टाकून बसून राहते. पाण्यातल्या मगरींवर नजर ठेवावी लागतेच पण गळाला लागलेले थोडेबहुत मासे घेऊन परतताना वाघानं झडप घातली, तर आपल्यामागे लहान मुलं पोरकी होतील, असा जीवाला घोर.. सुंदरबनातल्या अनेक तरुणींचा हा मूक आक्रोश आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पर्यावरणाच्या हासामुळे, अनियंत्रित पर्यटनामुळे, वन हक्क कायद्यातील त्रुटींमुळे तेथील लोकांचं निसर्गाशी असलेलं नातंच बदलून गेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मासे मिळणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं आहे. रोजीरोटी कमावण्यासाठी 'हे पाणी, जंगल सांभाळून घेईल, बोनोबीबी, मानसादेवी आपलं रक्षण करील,' अशा भाबड्या श्रद्धेनं ते खोलवर जंगलात, पाण्यात जातात आणि वाघाच्या किंवा मगरीच्या हल्ल्यात जीव गमावतात. अधिकृत नोंदींनुसार सुंदरबनात दर वर्षी २२ जणांचा वाघाच्या हल्ल्यामुळे मृत्यू होतो. कित्येक मृत्यू नोंदवलेच गेले नसल्याची शक्यता आहे.
Actions (login required)
|
View Item |